प्रेमाच्या त्या पहिल्या स्पर्शाची
अजूनही आठवण होई
जेव्हा माझी नजर सहज
आकाशीच्या चंद्राकडे जाई
असाच पौर्णिमेचा चंद्र होता त्या रात्री
तुझा हात आला जेव्हा सहज हाती
त्या स्पर्शाने माझा झाला निवडुंग
फुलूनी काटेच काटे मोहरले अंग
अजूनही त्या स्पर्शाची आठवण आहे मला
आकाशीचा चंद्र होता ज्या प्रेमाच्या साक्षीला
अजूनही आठवण होई
जेव्हा माझी नजर सहज
आकाशीच्या चंद्राकडे जाई
असाच पौर्णिमेचा चंद्र होता त्या रात्री
तुझा हात आला जेव्हा सहज हाती
त्या स्पर्शाने माझा झाला निवडुंग
फुलूनी काटेच काटे मोहरले अंग
अजूनही त्या स्पर्शाची आठवण आहे मला
आकाशीचा चंद्र होता ज्या प्रेमाच्या साक्षीला