Friday, October 28, 2022

भिंत

कोण म्हणतं मी एकटा पडलोय
माझ्याकडे माझी भिंत आहे॥धृ.॥
अहेव गेलेले माझे सुख
त्या भिंतीवर टांगले आहे

तिच्याकडे करून तोंड
मी बसतो जेवायला
जेवताना कंपनी द्यायला
आता तिलाच उसंत आहे॥२॥

माझ्या मनाचे हितगुज
मी करतो तिच्यासोबत
जरी चिडलो रागावलो
तरी ती शांत आहे॥३॥

हे सगळे घर शुष्क वाटे
पण ही भिंत सजीव आहे
तिच्या माझ्यासोबत आता
हा कोरडा एकांत आहे॥४॥

Wednesday, October 26, 2022

दान

आकाशातून 
बरसणारे
हे अगणित
 टपोरे मोती
तुझ्या मोकळ्या 
केसांत सजले
होऊन मग 
सुरेख माळ त्यांची
ते दान माझ्या 
ओंजळीत पडले

Tuesday, October 18, 2022

साथ तुझी माझी

साथ तुझी माझी
जुळली लग्नामुळे
संसाराचा वेलू
गेला गगनावरी
सुखाची दुःखांची प्रेमाची
उमलली त्यावर फुले
भांडलो ही खूप
रडलो ही खूप
लढलो ही खूप
पण सोबत होती
एकमेकांची साथ
वचन दिले होते एकमेकांना
सुटणार नाही हा हात
आता खूप लढाया
लढून झाल्या आहेत
जिंकून झाल्यात
हरूनही झाल्यात
तरीही अजून
दारूगोळा शाबूत आहे
लग्नाची कितवी वर्ष गाठ
आठवत नाही
पण अनंतापर्यंत
मी तुला साथ
देणार आहे

Monday, October 17, 2022

main

 आईने के सामने खडा हू  मगर   

वो मै अब नही राहा 

तुम्हारे नझर मैं  जो था 

मैं कहीं  नजर नहीं आ रहा 

Saturday, October 15, 2022

आरसा

आरसा ज्याचाही,आरसा त्याचाही
मग जो तो, ज्या त्या आरशात
ज्याला त्याला हवे तेच पाही 
हा दोष ज्याचाही,त्याचाही

ख्वाब

काली रात बीत गईं
सुबह होने को हैं
इन बंद आखों के पीछे छिपा
इक ख्वाब अब टूटने को हैं

इन आंखो के पीछे
महफ़ूज है मेरा ख्वाब
बस अब आंख खुलते ही
टूटकर बिखर जायेगा

फिर चुभेगा एक टुकडा
ख़्वाब का इन आखों में
और खारे आँसू बनके
मेरा दर्द बह जायेगा

Friday, October 14, 2022

मी म्हणतोय

आजकाल सगळेच दाखविती त्यांच्या नजरेचा आरसा
एकदा स्वतःच्या नजरेतून आरशात पहावे म्हणतोय

आजकाल सगळेच लावीती लेबले वेगवेगळी मला
एखादे लेबल त्यांनाही एकदा चिकटवावे म्हणतोय

सभ्य सोशीकपणाची सदा तोंडावर असते मुखपट्टी माझ्या
आता तिला कायमचे हटवून मनातले खरे बोलायचे म्हणतोय

खूप ऐकले सर्वांचे,त्रासही करून घेतला स्वतःला
आता त्या सर्वांना फाट्यावर मारायचं म्हणतोय

शेर

ख़्वाब सी हसीन ज़िंदगी की
तलाश मैं काँटों पे चल दिये
जब हुए उस ज़िंदगी से रूबरू
तो नाजूक फुल जख्म दे गये

अब किस बात का
जश्न मनाये हम
पाव कॉंटों से हैं भरे
ये दिल फुलों से जख्मी
तन्हाई है हमसफर हमारी
आंखों मे बस गईं हैं नमी

Wednesday, October 5, 2022

मी


जरी दिसतो मी असा शांत बसलेला
तरी मनात खूप काही चालू असलेला
विचारांच्या गर्दीत,शब्दांच्या साथीने
कवितेला शोधत फिरणारा............

गाज

त्याच्या किनारी उभा राहून 
माझा समुद्राशी संवाद चालला होता
घुमवत आपली गाज
तो मला प्रतिसाद देत होता

कृष्ण


अस्ताला चाललेल्या सूर्याला
सागराने अलगद कवेत घेतले
अंधार आला उगवून अन्
हे आकाश कृष्ण झाले....

माळ

तुझ्याप्रति व्यक्त होताना
मी शब्दांची माळ झालो
अन् माझ्याही नकळत
मी कविता होऊन गेलो

मी पणा


ज्या क्षणी त्याने 
पाहिले तुला 
त्या सुंदर गुलाबाचा
 मीपणा संपला

Saturday, October 1, 2022

चांदणी सेतू

आज दि. १ ऑक्टोबर 2022 रोजी पुण्यातला चांदणी चौक सेतू(Bridge) काल पाडण्यात आला अनेक वर्ष या सेतूने पुणेकरांना आपली सेवा पुरवली,आपल्या अंगाखांदयांवर वागवले पण आता त्याच्या सेवानिवृत्तीची वेळ आली होती. तो धोकादायक झाला होता. म्हणून ज्यांना त्याने आयुष्यभर आपल्या अंगाखांद्यांवर वागवले त्याच लोकांनी त्याला पद्धतशीरपणे नष्ट केले.आता त्या ठिकाणी नवीन चांगला नविन सेतू बांधण्यात येणार आहे. त्या पुलाचा लवकरच पुनर्जन्म होणार आहे.त्यामुळे असे नष्ट होणे त्या पुलालाही मंजूर असावे.


आजवर ज्यांना अंगाखांद्यांवर वागवले
धोकादायक म्हणून त्यांनीच मला नष्ट केले 

मी म्हणणार नाही की त्यांची काही चूक होती
माझ्या सेवानिवृत्तीची वेळही तशी जवळच होती 

माझा पुणेरी बाणा मी शेवटपर्यंत कधी सोडला नाही 
मोडून पडलो पण आयुष्यभर वाकलो मात्र नाही

आता फिरुनी नव्याने जन्मेन मी
पुन्हा एकदा तुमच्या सेवेत असेन मी 

आता शेवटचा माझा राम राम घ्यावा
माझ्यावर तुमचा कायम लोभ असावा