Saturday, October 1, 2022

चांदणी सेतू

आज दि. १ ऑक्टोबर 2022 रोजी पुण्यातला चांदणी चौक सेतू(Bridge) काल पाडण्यात आला अनेक वर्ष या सेतूने पुणेकरांना आपली सेवा पुरवली,आपल्या अंगाखांदयांवर वागवले पण आता त्याच्या सेवानिवृत्तीची वेळ आली होती. तो धोकादायक झाला होता. म्हणून ज्यांना त्याने आयुष्यभर आपल्या अंगाखांद्यांवर वागवले त्याच लोकांनी त्याला पद्धतशीरपणे नष्ट केले.आता त्या ठिकाणी नवीन चांगला नविन सेतू बांधण्यात येणार आहे. त्या पुलाचा लवकरच पुनर्जन्म होणार आहे.त्यामुळे असे नष्ट होणे त्या पुलालाही मंजूर असावे.


आजवर ज्यांना अंगाखांद्यांवर वागवले
धोकादायक म्हणून त्यांनीच मला नष्ट केले 

मी म्हणणार नाही की त्यांची काही चूक होती
माझ्या सेवानिवृत्तीची वेळही तशी जवळच होती 

माझा पुणेरी बाणा मी शेवटपर्यंत कधी सोडला नाही 
मोडून पडलो पण आयुष्यभर वाकलो मात्र नाही

आता फिरुनी नव्याने जन्मेन मी
पुन्हा एकदा तुमच्या सेवेत असेन मी 

आता शेवटचा माझा राम राम घ्यावा
माझ्यावर तुमचा कायम लोभ असावा

No comments:

Post a Comment