Friday, October 28, 2022

भिंत

कोण म्हणतं मी एकटा पडलोय
माझ्याकडे माझी भिंत आहे॥धृ.॥
अहेव गेलेले माझे सुख
त्या भिंतीवर टांगले आहे

तिच्याकडे करून तोंड
मी बसतो जेवायला
जेवताना कंपनी द्यायला
आता तिलाच उसंत आहे॥२॥

माझ्या मनाचे हितगुज
मी करतो तिच्यासोबत
जरी चिडलो रागावलो
तरी ती शांत आहे॥३॥

हे सगळे घर शुष्क वाटे
पण ही भिंत सजीव आहे
तिच्या माझ्यासोबत आता
हा कोरडा एकांत आहे॥४॥

No comments:

Post a Comment