असंच सुचलेले काही
Monday, August 23, 2021
उत्तर
माझे तुझ्यावर किती प्रेम आहे
आता याचे उत्तर काय देऊ???
बरं चल एक काम करू
आकाशातले तारे मोजून पाहू
सबुरी
शब्दांचा पसारा असतो
विचारांची गर्दी असते
तरी सबुरीने घ्यावे लागते
कविता अशीच साकारत असते
मांडणे
शब्दांचा साठा भरपूर आहे
कल्पनांनाही तोटा नाही
तरी अचूक विचार मांडणे
अजून काही जमत नाही
अबोलणे
झाल्या असतील चुका
मी ते नाकारत नाही!!
पण हे तुझे अबोलणे!!
ही शिक्षा मला मंजूर नाही
मोजदाद
तुझ्या आठवणींची मोजदाद चालू आहे
नेमक्या किती असतील??माहित नाही
असतील आकाशातल्या चांदण्यांएव्हढया!!
आता मोजणी संपेपर्यंत मला उसंत नाही!!!
जुनी वही
धुंद आठवणींनी भरलेली सापडली एक जुनी वही
तिला उघडून बघायची हिंमत अजून होत नाही
न जाणो पानाआड थांबलेले मोरपीस डोकावेल
अधिर भावनांना होईल घाई अन् अश्रूंचा बांध फुटेल
फरक
लोक म्हणले तू चांगला नाहीस
मला काही फरक पडत नाही
पण जे काही माझे असे आहे
ते अस्सल आहे हे मात्र नक्की
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)