Friday, October 14, 2022

शेर

ख़्वाब सी हसीन ज़िंदगी की
तलाश मैं काँटों पे चल दिये
जब हुए उस ज़िंदगी से रूबरू
तो नाजूक फुल जख्म दे गये

अब किस बात का
जश्न मनाये हम
पाव कॉंटों से हैं भरे
ये दिल फुलों से जख्मी
तन्हाई है हमसफर हमारी
आंखों मे बस गईं हैं नमी

Wednesday, October 5, 2022

मी


जरी दिसतो मी असा शांत बसलेला
तरी मनात खूप काही चालू असलेला
विचारांच्या गर्दीत,शब्दांच्या साथीने
कवितेला शोधत फिरणारा............

गाज

त्याच्या किनारी उभा राहून 
माझा समुद्राशी संवाद चालला होता
घुमवत आपली गाज
तो मला प्रतिसाद देत होता

कृष्ण


अस्ताला चाललेल्या सूर्याला
सागराने अलगद कवेत घेतले
अंधार आला उगवून अन्
हे आकाश कृष्ण झाले....

माळ

तुझ्याप्रति व्यक्त होताना
मी शब्दांची माळ झालो
अन् माझ्याही नकळत
मी कविता होऊन गेलो

मी पणा


ज्या क्षणी त्याने 
पाहिले तुला 
त्या सुंदर गुलाबाचा
 मीपणा संपला

Saturday, October 1, 2022

चांदणी सेतू

आज दि. १ ऑक्टोबर 2022 रोजी पुण्यातला चांदणी चौक सेतू(Bridge) काल पाडण्यात आला अनेक वर्ष या सेतूने पुणेकरांना आपली सेवा पुरवली,आपल्या अंगाखांदयांवर वागवले पण आता त्याच्या सेवानिवृत्तीची वेळ आली होती. तो धोकादायक झाला होता. म्हणून ज्यांना त्याने आयुष्यभर आपल्या अंगाखांद्यांवर वागवले त्याच लोकांनी त्याला पद्धतशीरपणे नष्ट केले.आता त्या ठिकाणी नवीन चांगला नविन सेतू बांधण्यात येणार आहे. त्या पुलाचा लवकरच पुनर्जन्म होणार आहे.त्यामुळे असे नष्ट होणे त्या पुलालाही मंजूर असावे.


आजवर ज्यांना अंगाखांद्यांवर वागवले
धोकादायक म्हणून त्यांनीच मला नष्ट केले 

मी म्हणणार नाही की त्यांची काही चूक होती
माझ्या सेवानिवृत्तीची वेळही तशी जवळच होती 

माझा पुणेरी बाणा मी शेवटपर्यंत कधी सोडला नाही 
मोडून पडलो पण आयुष्यभर वाकलो मात्र नाही

आता फिरुनी नव्याने जन्मेन मी
पुन्हा एकदा तुमच्या सेवेत असेन मी 

आता शेवटचा माझा राम राम घ्यावा
माझ्यावर तुमचा कायम लोभ असावा