Sunday, September 25, 2022

पाझर

समोरच्या घरातली खिडकी
नेहमी उघडी असायची
एका म्हाताऱ्या जीवाची
तिथे नेहमी लगबग दिसायची
दोन्ही मुले कधीच झाली
स्थायी परदेशात
सहचरणीची ही
खूप लवकर सुटली साथ
त्याच्या लोकांना
त्याच्यासाठी वेळ नव्हता
त्याला बोलायला
भिंती शिवाय पर्याय नव्हता
ज्यांच्या नावाने आयुष्यभर
मिशीला तूप लावले
तेच अंतिम क्षणी
त्याच्यासाठी कोणी नाही आले
त्याच्या घरावर
त्याच्या अस्तित्वाचा
अमित ठसा होता
त्याच्या जणांनी आज
घराच्या भिंतींना पाझर फुटला होता

No comments:

Post a Comment