Monday, September 12, 2022

नमन माझे तुला हे दुर्गा आदिशक्ती

नमन माझे तुला हे दुर्गा आदिशक्ती
लेवूनी कुंकूमवस्त्र जी बसली वाघावरती

महिमा तुझा गं गाती हे स्वर्गातले सूर
घेऊन त्रिशूळ हाती तू मारीला महिषासुर

हाती घेऊन विणा तू झालीस सरस्वती
घेऊनी कलश धनाचा बसे लक्ष्मी कमळावरती

पायी रक्तमुंडांचा पूर असे रूप कालीचे भयंकर
होऊनी अद्वैत महादेवाशी तू साकारला अर्धनारीनटेश्वर

विविध तुझी रूपे माते तू निर्गुण स्वरूप
नवरात्री येशी तू घेऊनी अष्टभुजारूप

तुझ्या दर्शनाची आता लागलीया आस
मिळो तुझा आशिष हाच आता ध्यास

देवी तुझी कृपा तुझ्या भक्तांवर राहू दे
तुझ्या सेवेची संधी माते सदैव आम्हांस लाभू दे


No comments:

Post a Comment