ओळखीच्या रस्त्यावरचे
ते वळण नेहमी खुणावे
वाटे मग मनाला एकदा तरी
त्या वळणावर जायला हवे
निदान मनातली
शंका तरी दूर होईल
नेमके काय आहे
त्या वळणावर
ते तरी समजून जाईल
ओळखीच्या रस्त्यावरच्या आठवणींना
मनात कायमचे स्थान आहे
या वळणावर नवीन आठवणी भेटतील
त्यांच्यासाठीही मनात जागा आहे
घेतो आता कौल मनाचा
त्याची काय इच्छा आहे
जावे त्या वळणावर ??
की म्हणावे आपला
नेहमीचाच रस्ता बरा आहे!!
मनाचे हे द्विधापण
मला काही नवीन नाही
त्यालाही त्या वळणावर
जावेसे वाटत असेलच की
नाही असे नाही
No comments:
Post a Comment