Wednesday, September 14, 2022

एकाकी

माझ्या एकटेपणाचे
आता काही वाटत नाही
जेव्हा गर्दीतही एकटे असलेले
बघितले जण काही
आजूबाजूला असूनही 
माणसांचा गोतावळा
मनात येई शंका यात नेमका
कोण असेल आपला???
मग वाटले यापेक्षा
आपला एकांत बरा
सुखाचा,दुःखाचा
आपलाच सोहळा
आपलेच आसू आणि
आपलेच हसू
पुसणाराही मी आणि
हसणाराही मीच
नको मला याद कोणाची
आणि नको मला कोणाची साथ
तृप्त आहे मी माझ्या या
एकाकी आयुष्यात

Tuesday, September 13, 2022

वेदनेची कविता होणे

वेदनेची कळ जोवर हृदयापर्यंत पोहोचत नाही
कवितेची ओळ मनावर काही केल्या उमटत नाही

शब्द असती हात जोडून उभे सारे
विचारांचेही असतात आजूबाजूला पसारे

तरी नेमकी भावना मांडणे काही केल्या जमत नाही

असेही काही नाही की शांत आहे मनाचा सरोवर
अविरत चालू असते त्यात खळबळ खळबळ

वेदनेचा दगड मग नेमका त्या जागी पडतो
होऊन निश्चल मन वेदनांचा शब्दांशी संवाद घडतो

शहाण्या मुलासारखे मग शब्द नीट उभे राहतात
वेदनेचे होई मग रूपांतर प्रवाही कडव्यांत

हा खेळ स्वतःची स्वतःचा सतत चालू असतो
सुई,सरोवर,खळबळ सारे काही तेच असते

फक्त फरक इतकाच,ती टोचणारी वेदना
मात्र प्रत्येक वेळी नवीन असते

शून्य

अंडाकृती गोळा पोकळ
भोवती ज्याच्या आकड्यांचा खेळ

ह्याला जमेला धरता येत नाही
कारण याला स्वतःला किंमत नाही

गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी
ह्याच्यावर कशाचाच परिणाम होत नाही

तरी हा गणितात सर्वात महत्त्वाचा
एका भारतीयाने लावला शोध ज्याचा

हा ज्याच्या मागे त्याचा भाव वाढे
उभा राही ज्याच्यापुढे त्याची किंमत पडे

ज्याच्या विना गणित न्यून
आर्यभट्टाची या जगाला देन

गणितातला आकडा असामान्य
जरी त्याला म्हणती शून्य

Monday, September 12, 2022

नमन माझे तुला हे दुर्गा आदिशक्ती

नमन माझे तुला हे दुर्गा आदिशक्ती
लेवूनी कुंकूमवस्त्र जी बसली वाघावरती

महिमा तुझा गं गाती हे स्वर्गातले सूर
घेऊन त्रिशूळ हाती तू मारीला महिषासुर

हाती घेऊन विणा तू झालीस सरस्वती
घेऊनी कलश धनाचा बसे लक्ष्मी कमळावरती

पायी रक्तमुंडांचा पूर असे रूप कालीचे भयंकर
होऊनी अद्वैत महादेवाशी तू साकारला अर्धनारीनटेश्वर

विविध तुझी रूपे माते तू निर्गुण स्वरूप
नवरात्री येशी तू घेऊनी अष्टभुजारूप

तुझ्या दर्शनाची आता लागलीया आस
मिळो तुझा आशिष हाच आता ध्यास

देवी तुझी कृपा तुझ्या भक्तांवर राहू दे
तुझ्या सेवेची संधी माते सदैव आम्हांस लाभू दे


Wednesday, September 7, 2022

सितारों से बातें

ढल गयी शाम,रात छा गयी
सितारोंकी मैफिल भी सज गयी

ढेर सारी बातें होंगी अब
इन सितारों के साथ

चांद भी याद रखेगा
आज की रात

कुछ दिल के राज खुलेंगे
हसीं मजाक होगा

महफिल होगी अब
और भी गुलशन
जब ये चांद शरीक होगा

बस ये भोर ना करे
अब जल्दी आने की

इन सितारों के साथ करनी
अभी काफी बातें है बाकी   

किमयागार

पानो पानी होई सळसळ
प्रणयाचा तो रंगला खेळ

प्रणयधुंद तो बेभान वारा
उधळी निशिगंधाचा साज सारा

ऐन वसंतात निशिगंधाचा
वाऱ्याशी शृंगार चाले

दळ हाले फुल थरथरे
लाजून निशिगंध होई गोरेमोरे

प्रणयाची ओसरता धुंदी 
तृप्त वारा मग होई सुगंधी

सलाम माझा त्याला
जो या प्रणयाचा शिल्पकार

दुसरा तिसरा कोणी नाही
तो निसर्ग नावाचा किमयागार

परतीचा पाऊस

सहज खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं
कृष्णमेघ आभाळ होतं मनासारखंच भरलेलं

मग त्या आभाळाला विजेची सूई टोचली
झाली मेघगर्जना,मनसोक्त सर बरसली

खिडकीतला तो पाऊस मला बोलवत होता
मनसोक्त भिजून घे असं सांगत होता

भिजलो मग त्या पावसात अगदी मनसोक्त
डोळ्यांतले अश्रू लपवायचं होतं ते निमित्त

अंगभर पाऊस मनभर आठवणी
येत होती ओठांवर पावसाची गाणी

कित्येक दिवसाने असं मनसोक्त भिजणं झालं
मन हलकं पिसासारखं,मुक्त स्वच्छंद झालं

हा मनस्वी पाऊस आनंद देऊन गेला
मी पुन्हा येईन हे सांगत तो परतला