Tuesday, September 7, 2021

राग


 माझ्या रागाचा मला
कधीच काही उपयोग नाही
कारण जिथे तो यायला हवा
तिथे तो येत नाही
जिथे तो येतो तिथे त्याला
कोणीही विचारत नाही
तरी त्याला जवळ बाळगतो
स्वतःवर काढण्यासाठी
कारण बाहेरच्या जगात
त्याला काहीच किंमत नाही

Wednesday, August 25, 2021

आजकाल


आजकाल सगळेच मोजून मापून बोलतात
बोलताना समोरच्याचा अंदाज घेत असतात 

हे तर आता या जगात अगदी रोजचेच झालेय
दिखाऊ व्यवहारी वागणे अंगवळणी पडतेय

मलाही आज काल हे चांगले जमू लागले आहे
हळूहळू मी ही त्यांच्यातलाच एक होत आहे 

पण अजूनही कधीतरी मनमोकळे हसणे होते
कशाचीच पर्वा न करता ढसाढसा रडायला येते 

माझ्यात जिवंत असलेल्या लहान मुलाला धन्यवाद 
त्याच्यामुळेच केवळ हे अजूनही सहज शक्य होते



तो

"तो" माझ्या अचानक समोर आला
आता मोठा साहेब जो होता झाला 

नेहमीच्या टपरीच्या ठिकाणीच भेट झाली होती
एकेकाळी आम्हा सर्वांची जी आवडती जागा होती 

आम्ही बाकीचे अजूनही त्या जागीच भेटत होतो
तो मात्र आज त्या टपरीकडे पाठमोरा उभा होता 

अचानकच आज आमची भेट झाली होती
माझ्यापेक्षा जास्त त्याला ती अपेक्षित नव्हती 

त्याचाही मग नाईलाज झाला
माझ्याकडे पाहून तो कसनुसं हसला 

आता सगळेच त्याचे परीटघडीचे होते
त्याचे वागणे ही त्याला अपवाद नव्हते

आमच्यात आता खूप अंतर पडले होते
त्याच्या नजरेत ते स्पष्टपणे जाणवत होते 

त्याचे हे अवघडणे चटकन लक्षात आले
मीच मग त्याला त्या अडचणीतून सोडवले 

त्याला सपशेल टाळून मी पुढचा रस्ता धरला
सुटकेचा निश्वास मग मला स्पष्टपणे ऐकू आला

आई

ठेच लागता कळ मस्तकात जाई 
देवाच्या आधी आठवे ती असे आई

पिता खंबीर वटवृक्षासम भासे
त्याची शीतल छाया म्हणजे आई 

इवलेसे विश्व माझे,माझ्यापुरते असलेले
त्याचे विराट विश्वरूप म्हणजे तूच आई 

कंठ दाटला डोळा आले पाणी
तू स्मरता नेहमी असेच होते आई












प्रारब्ध


माझ्या दुःखाला मलाच सावरू दे
डोळ्यांतले अश्रु वाहून जाऊ दे
प्रारब्ध कोणालाही न चुकले 
माझेही मलाच बघून घेऊ दे

मित्र


माझ्या सुखांत दुःखांत
माझ्यासोबत कोण असेल
माहित नाही!!!!
मित्रा तू माझ्यासोबत
नेहमी असशील यात काहीच
शंका नाही!!!!

Tuesday, August 24, 2021

उमर

चलो कही रास्ते से ऐसे भटक जायें
हमे ढूंढने मे औरोंकी उमर खर्च हो जायें