"तो" माझ्या अचानक समोर आला
आता मोठा साहेब जो होता झाला
नेहमीच्या टपरीच्या ठिकाणीच भेट झाली होती
एकेकाळी आम्हा सर्वांची जी आवडती जागा होती
आम्ही बाकीचे अजूनही त्या जागीच भेटत होतो
तो मात्र आज त्या टपरीकडे पाठमोरा उभा होता
अचानकच आज आमची भेट झाली होती
माझ्यापेक्षा जास्त त्याला ती अपेक्षित नव्हती
त्याचाही मग नाईलाज झाला
माझ्याकडे पाहून तो कसनुसं हसला
आता सगळेच त्याचे परीटघडीचे होते
त्याचे वागणे ही त्याला अपवाद नव्हते
आमच्यात आता खूप अंतर पडले होते
त्याच्या नजरेत ते स्पष्टपणे जाणवत होते
त्याचे हे अवघडणे चटकन लक्षात आले
मीच मग त्याला त्या अडचणीतून सोडवले
त्याला सपशेल टाळून मी पुढचा रस्ता धरला
सुटकेचा निश्वास मग मला स्पष्टपणे ऐकू आला
No comments:
Post a Comment