आजकाल सगळेच मोजून मापून बोलतात
बोलताना समोरच्याचा अंदाज घेत असतात
हे तर आता या जगात अगदी रोजचेच झालेय
दिखाऊ व्यवहारी वागणे अंगवळणी पडतेय
मलाही आज काल हे चांगले जमू लागले आहे
हळूहळू मी ही त्यांच्यातलाच एक होत आहे
पण अजूनही कधीतरी मनमोकळे हसणे होते
कशाचीच पर्वा न करता ढसाढसा रडायला येते
माझ्यात जिवंत असलेल्या लहान मुलाला धन्यवाद
त्याच्यामुळेच केवळ हे अजूनही सहज शक्य होते