Friday, September 30, 2022

स्वरसम्राज्ञी

आजही जेव्हा होई
आकाशात मेघगर्जना
वाटे स्वर्गातले देवही
दाद देत असतील
तिच्या गाण्यांना

आजची तारीख होती
बरोबर वर्षभरापूर्वी
आपल्याला सोडून ती
अनंतात विलीन झाली

जाताना सोडून गेली
अगणित अविट गाणी
स्वरांच्या राज्याची होती
जी अनभिषिक्त राणी

तो चराचर व्यापून राहिलेला
चिरंतन स्वर म्हणजेच
भारतरत्न स्वरसम्राज्ञी
लता मंगेशकर

असूर

जरी आज सगळे मिळून तुम्ही मला जाळणार
पण तुमच्या आतही आहे मी!! त्याचं काय करणार??

असतो मी प्रत्येकात दडून बसलेला
मनाच्या अंधारात अस्वस्थ असलेला

मग मला एखादे पुरे असते कारण
तप्त लाव्ह्यासम मी फुटून येई पटकन

माझ्यामुळे मानवाचा दानव होई
त्याचे माणूसपण क्षणात संपून जाई

मेंदू त्याचा माझ्या कह्यात असतो
माझ्यावतीने मग तो तांडव घालतो

असलो जरी मी स्वतः पूर्ण अरूप 
ज्याच्यावरती स्वार मी,तेच माझे रूप 

कोणी म्हणे अधम,कोणी राक्षस म्हणती ज्याला
मी केवळ एक प्रवृत्ती,असूर म्हणतात मला


Wednesday, September 28, 2022

लता मंगेशकर

संगीतातला कल्पवृक्ष तो
जिच्या पुढे नतमस्तक सातही स्वर

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
"भारतरत्न" लता मंगेशकर

प्रतिभावंत पित्याची असामान्य लेक
स्वरसरोवरातला जणू राजहंस तो एक

आपल्या स्वरस्पर्शाने तिने
केले किती जणांना पावन

मग असो तो ए.आर.रहमान
नौशाद वा असो तो रोशन

सहा दशकांचा सुरेल प्रवास
आवाजात तिच्या सरस्वतीचा वास

होती जरी ती स्वरसम्राज्ञी
कधीच नाही मिरवले ते मोठेपण

आयुष्यभर होते जपले तिने
वागण्या बोलण्यातले साधेपण

तीस हजारांहून अधिक गाण्यांना
गाऊन अजरामर तिने केले

त्या विधात्यालाही दुसरी लता
घडवणे आजवर न जमले

माहित नाही कोणालाच
कधी होईल जगाचा अंत

पण स्वरलतेचा चिरंतन स्वर
सृष्टीत ऐकू येईल तोपर्यंत

Tuesday, September 27, 2022

बॅट अजूनही तारुण्यात

सध्या क्रिकेटमधल्या वरिष्ठ खेळाडूंची MASTER'S CUP स्पर्धा चालू होती त्यामध्ये भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यात MASTER BLASTER सचिन तेंडुलकरने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस ट्रेमलेटच्या गोलंदाजीवर एक उत्तुंग षटकार मारला आणि सर्वत्र या सीमारेषेच्या कितीतरी पुढे पडलेल्या षटकाराची चर्चा सुरू झाली.अर्थातच भारत तो सामना जिंकला आणि सचिनने त्या सामन्यामध्ये 20 चेंडूंमध्ये 40 धावांची वादळी खेळी केली.वयाच्या पन्नाशीला अवघी एक धाव कमी असलेला सचिन या खेळी दरम्यान कुठेही थकलेला दिसला नाही.त्याची आक्रमक शैली ही तशीच होती आणि running between the wickets ही तेवढ्याच आक्रमकपणे धावत होता. या षटकाराची चर्चा सुरू झाल्यानंतर इंटरनेटवर सचिनची ही खेळी,हा सामना आणि विशेषतः हा षटकार मी पुन्हा पुन्हा पाहिला आणि मग माझ्या मनाच्या पटलावर या ओळी उमटत गेल्या......


अजूनही तीच जुनी परिचित शैली
आणि फटक्यांतही तीच ताकद आहे
आमचा देव जरी वयाने वाढला असला
तरी त्याची बॅट अजूनही तारुण्यात आहे


Sunday, September 25, 2022

पाझर

समोरच्या घरातली खिडकी
नेहमी उघडी असायची
एका म्हाताऱ्या जीवाची
तिथे नेहमी लगबग दिसायची
दोन्ही मुले कधीच झाली
स्थायी परदेशात
सहचरणीची ही
खूप लवकर सुटली साथ
त्याच्या लोकांना
त्याच्यासाठी वेळ नव्हता
त्याला बोलायला
भिंती शिवाय पर्याय नव्हता
ज्यांच्या नावाने आयुष्यभर
मिशीला तूप लावले
तेच अंतिम क्षणी
त्याच्यासाठी कोणी नाही आले
त्याच्या घरावर
त्याच्या अस्तित्वाचा
अमित ठसा होता
त्याच्या जणांनी आज
घराच्या भिंतींना पाझर फुटला होता

मुकद्दर


आखें हैं नम और हाथों मैं जाम हैं
तेरी बेवफाई के चर्चे आज आम हैं॥

क्या कुछ नही किया तेरे लिये सनम
आज तेरी रुसवाई का हम पे इल्जाम हैं॥

तेरे लिये जिस दुनिया से लडा मैं
आज उसे दुनिया मे तू शामिल हैं॥

फिर भी तुझे बेवफा ना कहूंगा मैं
तू मेरे लिये प्यार का दुसरा नाम हैं॥

नाजूक सा ये दिल मेरा
एक झटके मैं तोड दिया तूने॥

फिर भी उस दिल की
हर एक टूकडे मे तू ही तू हैं॥

अब शायद किसी से वफा
ना कर पाउंगा मैं॥

तेरी यादों के साथ जीना ही
अब मेरा मुकद्दर हैं॥

वळण

                     ओळखीच्या रस्त्यावरचे
                      ते वळण नेहमी खुणावे 
                     वाटे मग मनाला एकदा तरी
                      त्या वळणावर जायला हवे
निदान मनातली 
शंका तरी दूर होईल
नेमके काय आहे 
त्या वळणावर 
ते तरी समजून जाईल 
                   ओळखीच्या रस्त्यावरच्या आठवणींना 
                    मनात कायमचे स्थान आहे
                    या वळणावर नवीन आठवणी भेटतील
                    त्यांच्यासाठीही मनात जागा आहे
घेतो आता कौल मनाचा
त्याची काय इच्छा आहे
जावे त्या वळणावर ??
की म्हणावे आपला
नेहमीचाच रस्ता बरा आहे!!
                        मनाचे हे द्विधापण 
                       मला काही नवीन नाही 
                       त्यालाही त्या वळणावर 
                      जावेसे वाटत असेलच की
                       नाही असे नाही

मी जिंकलो मी जिंकलो!!!!!

उगा चिडण्याचा काय उपयोग आता
जेंव्हा हाती आल्या तिच्या लग्नातल्या अक्षता

एवढं काय हिने बघितलं ह्याच्यात
असं म्हणत मी मनाला समजावत होतो

आणि तिच्या लग्नाच्या पंगतीत जेवणावर
मस्त आडवा हात मारत होतो

"स्माईल प्लीज" म्हणत फोटोग्राफरने
फोटोसाठी इशारा केला

तिने त्याचा धरलेला घट्ट हात
काळजावर वार करून गेला

इतक्यात तिची मैत्रीण
माझ्याकडे बघून गोड हसली

जणू कुणी माझ्या जखमी मनावर
हलकेच गुलाबी फुंकर मारली

मग वाटले काय झाले जरी
प्रेमाचा हा डाव मी हरलो

जिंकून पुढचा डाव मग
ओरडून सांगेन जगाला

मी जिंकलो मी जिंकलो!!!!!
 










स्वामी पाठीराखा


भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
एकदा विश्वासाने मागे वळून तर बघ

नाही आलास भेटीला माझ्या तरी चालेल
असशील तिथून हाक मारून तर बघ

स्वामी हा समर्थ निवारण्या तूझी दुःखे
माझ्याशी एकदा मनातलं बोलून तर बघ

शोधू नको मला या बाहेरच्या दुनियेत
स्वतःच्या आत एकदा डोकावून तर बघ


Friday, September 23, 2022

ठिपका

दिसे जरी टिकली एव्हढा
आकाशीचा हा लाल ठिपका
दाही दिशा उजळून टाकेल
ताकदवान आहे तो इतका

मध्यमवर्गीय

असलेल्या गोष्टींचा
ना माज आम्हाला ना
नसलेल्या गोष्टींचे कधी
भांडवल आम्ही करतो
                               म्हणूनच असे कदाचित
                               आम्ही मध्यमवर्गीय
                               सदैव आनंदात असतो

घराचा जरी नसला
तरी आमच्या मनाचा
एरिया मोठा असतो
                             म्हणूनच असेल कदाचित
                            आम्ही मध्यमवर्गीय
                             सदैव आनंदात असतो

असलो माणसे आम्ही
विविध जातीधर्माची
तरी शेजारधर्म हाच
आमच्यासाठी मोठा असतो
                                 म्हणूनच असेल कदाचित
                                 आम्ही मध्यमवर्गीय
                                  सदैव आनंदात असतो

महिनाअखेरीची जुळवाजुळव
ही नेहमीचीच आम्हाला
तरी आमचे सणवार आम्ही
थाटात साजरे करतो
                                     म्हणूनच असेल कदाचित
                                     आम्ही मध्यमवर्गीय
                                     सदैव आनंदात असतो

छोट्या छोट्या गोष्टींनी
मिळे सुख आम्हाला
दुसऱ्याच्या आनंदातही
आम्ही आनंद मानतो
                                 म्हणूनच असेल कदाचित
                                 आम्ही मध्यमवर्गीय
                                 सदैव आनंदी असतो







Sunday, September 18, 2022

दिवे

झाकोळला सूर्य
अंधार पसरला
लागले तारकांचे दिवे
चंद्र प्रकाशून आला

बहरणे

बाकी काही नको मला
फक्त तुझा बहर दे
नुसताच उमललो मी
आता बहरणे कळू दे

Friday, September 16, 2022

क्षितीज स्पर्श

वाटे त्या कवितेचे क्षितिज
एकदातरी स्पर्शावे
या माझ्या आयुष्यातले जे
माझे सर्वोत्तम काम असावे

काही झाले तरी क्षितीज ते
सतत मोहात पाडत राही
जितके जावे त्याच्याजवळ
तितकेच लांब दिसत जाई

मग वाटे ज्यावेळी होईल
तो क्षितिज स्पर्श
काही बघावेसे वाटणार
नाही मग फारसं

कारण  हा प्रवासही मला
खूप आनंद देत आहे
नवीन नवीन कवितांच्या
बेटांचा शोध मला लागत आहे

म्हणून मला स्वामी या
प्रवासातच कायम असू दे
त्या अलौकिक क्षितिजस्पर्शाचे
गूढ आकर्षण असेच कायम राहू दे

Thursday, September 15, 2022

घाव

झाला होता उशीर,निसटली होती संधी
आता फक्त मिरवणे ही जखम सुगंधी

मनातले आले नाही वेळेवर ओठांत
गुलाबी स्वप्ने विरली मग सारी हवेत

कसे समजावू आता माझ्या हृदयाला
जेव्हा दुसऱ्याची होताना बघितलं तिला

घाव हा वाटत नाही लवकर भरेल
जरी भरला तरी व्रण होऊन उरेल

Wednesday, September 14, 2022

पांडूरंग

 तुझ्याविना पांडुरंगा
वाटे हा संसार विटाळ

रमावे तुझ्या कीर्तनात
हाती घेऊनिया टाळ

मोहमायेच्या विंचवाने
जहरी डंख मारियेला

झाली अंगाची काहिली
मेंदू बधिर जाहला

आता वाटे मला लाभो
तुझ्या भक्तीचे अमृत

मोहमायेचे हे विष देवा
मग उतरवून जावे

मिळावे मज सावळ्या
तुझ्या पायांशी स्थान

ओठी तुझे नाम विठ्ठला
मन आनंदनिधान



एकाकी

माझ्या एकटेपणाचे
आता काही वाटत नाही
जेव्हा गर्दीतही एकटे असलेले
बघितले जण काही
आजूबाजूला असूनही 
माणसांचा गोतावळा
मनात येई शंका यात नेमका
कोण असेल आपला???
मग वाटले यापेक्षा
आपला एकांत बरा
सुखाचा,दुःखाचा
आपलाच सोहळा
आपलेच आसू आणि
आपलेच हसू
पुसणाराही मी आणि
हसणाराही मीच
नको मला याद कोणाची
आणि नको मला कोणाची साथ
तृप्त आहे मी माझ्या या
एकाकी आयुष्यात

Tuesday, September 13, 2022

वेदनेची कविता होणे

वेदनेची कळ जोवर हृदयापर्यंत पोहोचत नाही
कवितेची ओळ मनावर काही केल्या उमटत नाही

शब्द असती हात जोडून उभे सारे
विचारांचेही असतात आजूबाजूला पसारे

तरी नेमकी भावना मांडणे काही केल्या जमत नाही

असेही काही नाही की शांत आहे मनाचा सरोवर
अविरत चालू असते त्यात खळबळ खळबळ

वेदनेचा दगड मग नेमका त्या जागी पडतो
होऊन निश्चल मन वेदनांचा शब्दांशी संवाद घडतो

शहाण्या मुलासारखे मग शब्द नीट उभे राहतात
वेदनेचे होई मग रूपांतर प्रवाही कडव्यांत

हा खेळ स्वतःची स्वतःचा सतत चालू असतो
सुई,सरोवर,खळबळ सारे काही तेच असते

फक्त फरक इतकाच,ती टोचणारी वेदना
मात्र प्रत्येक वेळी नवीन असते

शून्य

अंडाकृती गोळा पोकळ
भोवती ज्याच्या आकड्यांचा खेळ

ह्याला जमेला धरता येत नाही
कारण याला स्वतःला किंमत नाही

गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी
ह्याच्यावर कशाचाच परिणाम होत नाही

तरी हा गणितात सर्वात महत्त्वाचा
एका भारतीयाने लावला शोध ज्याचा

हा ज्याच्या मागे त्याचा भाव वाढे
उभा राही ज्याच्यापुढे त्याची किंमत पडे

ज्याच्या विना गणित न्यून
आर्यभट्टाची या जगाला देन

गणितातला आकडा असामान्य
जरी त्याला म्हणती शून्य

Monday, September 12, 2022

नमन माझे तुला हे दुर्गा आदिशक्ती

नमन माझे तुला हे दुर्गा आदिशक्ती
लेवूनी कुंकूमवस्त्र जी बसली वाघावरती

महिमा तुझा गं गाती हे स्वर्गातले सूर
घेऊन त्रिशूळ हाती तू मारीला महिषासुर

हाती घेऊन विणा तू झालीस सरस्वती
घेऊनी कलश धनाचा बसे लक्ष्मी कमळावरती

पायी रक्तमुंडांचा पूर असे रूप कालीचे भयंकर
होऊनी अद्वैत महादेवाशी तू साकारला अर्धनारीनटेश्वर

विविध तुझी रूपे माते तू निर्गुण स्वरूप
नवरात्री येशी तू घेऊनी अष्टभुजारूप

तुझ्या दर्शनाची आता लागलीया आस
मिळो तुझा आशिष हाच आता ध्यास

देवी तुझी कृपा तुझ्या भक्तांवर राहू दे
तुझ्या सेवेची संधी माते सदैव आम्हांस लाभू दे


Wednesday, September 7, 2022

सितारों से बातें

ढल गयी शाम,रात छा गयी
सितारोंकी मैफिल भी सज गयी

ढेर सारी बातें होंगी अब
इन सितारों के साथ

चांद भी याद रखेगा
आज की रात

कुछ दिल के राज खुलेंगे
हसीं मजाक होगा

महफिल होगी अब
और भी गुलशन
जब ये चांद शरीक होगा

बस ये भोर ना करे
अब जल्दी आने की

इन सितारों के साथ करनी
अभी काफी बातें है बाकी   

किमयागार

पानो पानी होई सळसळ
प्रणयाचा तो रंगला खेळ

प्रणयधुंद तो बेभान वारा
उधळी निशिगंधाचा साज सारा

ऐन वसंतात निशिगंधाचा
वाऱ्याशी शृंगार चाले

दळ हाले फुल थरथरे
लाजून निशिगंध होई गोरेमोरे

प्रणयाची ओसरता धुंदी 
तृप्त वारा मग होई सुगंधी

सलाम माझा त्याला
जो या प्रणयाचा शिल्पकार

दुसरा तिसरा कोणी नाही
तो निसर्ग नावाचा किमयागार

परतीचा पाऊस

सहज खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं
कृष्णमेघ आभाळ होतं मनासारखंच भरलेलं

मग त्या आभाळाला विजेची सूई टोचली
झाली मेघगर्जना,मनसोक्त सर बरसली

खिडकीतला तो पाऊस मला बोलवत होता
मनसोक्त भिजून घे असं सांगत होता

भिजलो मग त्या पावसात अगदी मनसोक्त
डोळ्यांतले अश्रू लपवायचं होतं ते निमित्त

अंगभर पाऊस मनभर आठवणी
येत होती ओठांवर पावसाची गाणी

कित्येक दिवसाने असं मनसोक्त भिजणं झालं
मन हलकं पिसासारखं,मुक्त स्वच्छंद झालं

हा मनस्वी पाऊस आनंद देऊन गेला
मी पुन्हा येईन हे सांगत तो परतला