Friday, September 30, 2022

असूर

जरी आज सगळे मिळून तुम्ही मला जाळणार
पण तुमच्या आतही आहे मी!! त्याचं काय करणार??

असतो मी प्रत्येकात दडून बसलेला
मनाच्या अंधारात अस्वस्थ असलेला

मग मला एखादे पुरे असते कारण
तप्त लाव्ह्यासम मी फुटून येई पटकन

माझ्यामुळे मानवाचा दानव होई
त्याचे माणूसपण क्षणात संपून जाई

मेंदू त्याचा माझ्या कह्यात असतो
माझ्यावतीने मग तो तांडव घालतो

असलो जरी मी स्वतः पूर्ण अरूप 
ज्याच्यावरती स्वार मी,तेच माझे रूप 

कोणी म्हणे अधम,कोणी राक्षस म्हणती ज्याला
मी केवळ एक प्रवृत्ती,असूर म्हणतात मला


No comments:

Post a Comment