Wednesday, September 28, 2022

लता मंगेशकर

संगीतातला कल्पवृक्ष तो
जिच्या पुढे नतमस्तक सातही स्वर

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
"भारतरत्न" लता मंगेशकर

प्रतिभावंत पित्याची असामान्य लेक
स्वरसरोवरातला जणू राजहंस तो एक

आपल्या स्वरस्पर्शाने तिने
केले किती जणांना पावन

मग असो तो ए.आर.रहमान
नौशाद वा असो तो रोशन

सहा दशकांचा सुरेल प्रवास
आवाजात तिच्या सरस्वतीचा वास

होती जरी ती स्वरसम्राज्ञी
कधीच नाही मिरवले ते मोठेपण

आयुष्यभर होते जपले तिने
वागण्या बोलण्यातले साधेपण

तीस हजारांहून अधिक गाण्यांना
गाऊन अजरामर तिने केले

त्या विधात्यालाही दुसरी लता
घडवणे आजवर न जमले

माहित नाही कोणालाच
कधी होईल जगाचा अंत

पण स्वरलतेचा चिरंतन स्वर
सृष्टीत ऐकू येईल तोपर्यंत

No comments:

Post a Comment