Tuesday, September 13, 2022

वेदनेची कविता होणे

वेदनेची कळ जोवर हृदयापर्यंत पोहोचत नाही
कवितेची ओळ मनावर काही केल्या उमटत नाही

शब्द असती हात जोडून उभे सारे
विचारांचेही असतात आजूबाजूला पसारे

तरी नेमकी भावना मांडणे काही केल्या जमत नाही

असेही काही नाही की शांत आहे मनाचा सरोवर
अविरत चालू असते त्यात खळबळ खळबळ

वेदनेचा दगड मग नेमका त्या जागी पडतो
होऊन निश्चल मन वेदनांचा शब्दांशी संवाद घडतो

शहाण्या मुलासारखे मग शब्द नीट उभे राहतात
वेदनेचे होई मग रूपांतर प्रवाही कडव्यांत

हा खेळ स्वतःची स्वतःचा सतत चालू असतो
सुई,सरोवर,खळबळ सारे काही तेच असते

फक्त फरक इतकाच,ती टोचणारी वेदना
मात्र प्रत्येक वेळी नवीन असते

No comments:

Post a Comment