Tuesday, September 27, 2022

बॅट अजूनही तारुण्यात

सध्या क्रिकेटमधल्या वरिष्ठ खेळाडूंची MASTER'S CUP स्पर्धा चालू होती त्यामध्ये भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यात MASTER BLASTER सचिन तेंडुलकरने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस ट्रेमलेटच्या गोलंदाजीवर एक उत्तुंग षटकार मारला आणि सर्वत्र या सीमारेषेच्या कितीतरी पुढे पडलेल्या षटकाराची चर्चा सुरू झाली.अर्थातच भारत तो सामना जिंकला आणि सचिनने त्या सामन्यामध्ये 20 चेंडूंमध्ये 40 धावांची वादळी खेळी केली.वयाच्या पन्नाशीला अवघी एक धाव कमी असलेला सचिन या खेळी दरम्यान कुठेही थकलेला दिसला नाही.त्याची आक्रमक शैली ही तशीच होती आणि running between the wickets ही तेवढ्याच आक्रमकपणे धावत होता. या षटकाराची चर्चा सुरू झाल्यानंतर इंटरनेटवर सचिनची ही खेळी,हा सामना आणि विशेषतः हा षटकार मी पुन्हा पुन्हा पाहिला आणि मग माझ्या मनाच्या पटलावर या ओळी उमटत गेल्या......


अजूनही तीच जुनी परिचित शैली
आणि फटक्यांतही तीच ताकद आहे
आमचा देव जरी वयाने वाढला असला
तरी त्याची बॅट अजूनही तारुण्यात आहे


No comments:

Post a Comment