Sunday, September 25, 2022

मी जिंकलो मी जिंकलो!!!!!

उगा चिडण्याचा काय उपयोग आता
जेंव्हा हाती आल्या तिच्या लग्नातल्या अक्षता

एवढं काय हिने बघितलं ह्याच्यात
असं म्हणत मी मनाला समजावत होतो

आणि तिच्या लग्नाच्या पंगतीत जेवणावर
मस्त आडवा हात मारत होतो

"स्माईल प्लीज" म्हणत फोटोग्राफरने
फोटोसाठी इशारा केला

तिने त्याचा धरलेला घट्ट हात
काळजावर वार करून गेला

इतक्यात तिची मैत्रीण
माझ्याकडे बघून गोड हसली

जणू कुणी माझ्या जखमी मनावर
हलकेच गुलाबी फुंकर मारली

मग वाटले काय झाले जरी
प्रेमाचा हा डाव मी हरलो

जिंकून पुढचा डाव मग
ओरडून सांगेन जगाला

मी जिंकलो मी जिंकलो!!!!!
 










No comments:

Post a Comment