Wednesday, September 14, 2022

पांडूरंग

 तुझ्याविना पांडुरंगा
वाटे हा संसार विटाळ

रमावे तुझ्या कीर्तनात
हाती घेऊनिया टाळ

मोहमायेच्या विंचवाने
जहरी डंख मारियेला

झाली अंगाची काहिली
मेंदू बधिर जाहला

आता वाटे मला लाभो
तुझ्या भक्तीचे अमृत

मोहमायेचे हे विष देवा
मग उतरवून जावे

मिळावे मज सावळ्या
तुझ्या पायांशी स्थान

ओठी तुझे नाम विठ्ठला
मन आनंदनिधान



No comments:

Post a Comment