Wednesday, September 7, 2022

परतीचा पाऊस

सहज खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं
कृष्णमेघ आभाळ होतं मनासारखंच भरलेलं

मग त्या आभाळाला विजेची सूई टोचली
झाली मेघगर्जना,मनसोक्त सर बरसली

खिडकीतला तो पाऊस मला बोलवत होता
मनसोक्त भिजून घे असं सांगत होता

भिजलो मग त्या पावसात अगदी मनसोक्त
डोळ्यांतले अश्रू लपवायचं होतं ते निमित्त

अंगभर पाऊस मनभर आठवणी
येत होती ओठांवर पावसाची गाणी

कित्येक दिवसाने असं मनसोक्त भिजणं झालं
मन हलकं पिसासारखं,मुक्त स्वच्छंद झालं

हा मनस्वी पाऊस आनंद देऊन गेला
मी पुन्हा येईन हे सांगत तो परतला

No comments:

Post a Comment